लोकमान्य ग्रंथालयातर्फे श्रीनिवास कुलकर्णी लिखित ” भाराभर चिंध्या ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. २३-१२-२०१७ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सुपसिद्ध साहित्यिका डॉ. विजया वाड यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अनिल चौधरी हे असतील.
हा कार्यक्रम लोकमान्य ग्रंथालयाच्या मागील इंदिरा संत कलामंच येथे होणार असून सर्व श्रोत्यानी ५.३० पर्यंत उपस्थित रहावे असे आवाहन लोकमान्य ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.