सतत च्या दंगली, त्यावेळी जीवावर बेतण्याचा धोका त्यानंतर पोलिसांच्या धरपकडी यामुळे खडक गल्ली आणि जालगार गल्लीत राहणे अवघड झाले आहे. तेथील सामान्य जनता आता दुसरीकडे स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहे, यामुळे येथील महत्वाच्या जागा बळकावण्याच्या तयारीत असलेले भूमाफियातर असंतोषाचे जनक नाहीत ना? असा संशय बोलला जात आहे.
सध्या दंगल माजवण्याचा सारा संशय राजकीय मंडळींवर जात आहे. हिंदू आणि मुस्लिम असा भेद तयार करून मतांचे राजकारण निर्माण करायचा राजकीय व्यक्तींचा प्रयत्न दिसत आहे. अशावेळी काही भूमाफिया राजकारणी या भागात राहणेच धोक्याचे कसे आहे याची माहिती परिसरात पसरवून आपली पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. यामुळे दंगल माजवण्यात भूमाफिया आणि राजकारणी हे दोघेही एकत्रित असल्याचा संशय जास्त आहे.
या भागात पाहुणे येत नाहीत. कधी दंगल होईल आणि पोलीस घरात घुसून उचलून नेतील यांचा नेम नाही, दंगल झाली की तरुणांना पळून जावे लागते यामुळे भाड्याने घर घेऊन राहण्यास कोण तयार नाहीत, यामुळे दंगल न करणारा सामान्य माणूस कंटाळला आहे, याकडे पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे.
राजकीय आणि आर्थिक स्वार्थापोटी लोकांना पळून जायला लावून मिळवलेली मालमत्ता कुणालाही लाभणार नाही तर तळतळाट लागेल हेच खरे आहे.
Trending Now