आपला कचरा शेजाऱ्याच्या दारात फेकण्याची प्रवृत्ती लोकात असतेच. एकीकडे रोजच्या कचऱ्याची उचल करण्यासाठी मनपाने कचऱ्याच्या गाड्या नेमल्या असतानाही लोक कुठेही चोरून कचरा फेकतात. त्यात त्यांना कसले सुख मिळते माहीत नाही पण असा कचरा फेकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी एक नगरसेवकाने चक्क सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
वॉर्ड क्र ३ चे नगरसेवक दीपक जमखंडी यांनी ही कमाल केली आहे. त्यांच्या वॉर्डात कचरा फेकणारे वाढल्याने त्यांनी ही शक्कल वापरली आहे.
आर सी नगर, राघवेन्द्र कॉलनी, पार्वती नगर, लक्ष्मी नगर गुरुप्रसाद नगर, कावेरी नगर सारख्या काही भागात काही मोक्याच्या ठिकाणी असा कचरा फेकला जात होता.
जमखंडी यांनी स्वतः खर्च करून कॅमेरे बसवून टाकले असून असा कचरा टाकणाऱ्यावर नजर ठेवून दंड बसवला जाणार आहे. सध्या हा प्रकार ४० टक्क्याने कमी झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली.