बेळगावच्या श्रीधर माळगी याने दुबई येथे ८ ते १४ डिसेंबर दरम्यान झालेल्या आशियाई युवा पॅरा गेम्स मध्ये एक रौप्य आणि दोन कास्य पदकांची कामे केली आहे श्रीधर हा बेळगाव येथील अपंग स्विमिंग खेळाडू आहे त्याने भारताचे प्रतिनिधित्व करताना १०० मीटर बॅकस्ट्रोक रौप्य पदक तर १०० आणि २०० मीटर बटरफ्लाय मध्ये कांस्य पदकांची कमाई केली आहे .
उदयपूर मध्ये पॅरा राष्ट्रीय स्विमिंग स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे तो त्याची निवड दुबई येथील स्पर्धेसाठी भारतीय टीम मध्ये झाली होती त्यावेळी त्याने पाच पदकांची कमाई केली होती आता पर्यंत त्याने २७ राष्ट्रीय स्तरावरील पदक मिळवली असून त्यात २० सुवर्ण ६ रौप्य आणि १ कांस्य पदकाचा समावेश आहे आता त्याने टोकियो येथे २०२० मध्ये होणाऱ्या पॅरा ऑलम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेची तयारी सुरु केली आहे