सोमवार रात्री खडक गल्ली परिसरात झालेली जाळपोळ घटने मागे नेमके कोण आहेत याचा शोध पोलिसांनी लावावा या शिवाय शहरात वारंवार होणाऱ्या घटना रोखण्यासाठी यामागे ड्रग्ज माफिया आहेत का याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. बुधवारी सकाळी शहर समितीचे उपाध्यक्ष टी के पाटील यांच्या नेतृत्वात समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि प्रभारी पोलीस आयुक्त रामचंद्र राव यांची भंते घेऊन सादर मागणी केली आहे .
बेळगाव परिसरात अलीकडे नशा करणाऱ्या युवकांची संख्या वाढली आहे नशा करणाऱ्यांचे रॅकेट यामागे आहे का याचा तपास पोलिसांनी करावा तसेच जिल्हा प्रशासनाने यावर उपाय योजना करून दंगल खोरावर गुंडा कायद्यांचा वापर करावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे . यावेळी माजी महापौर किरण सायनाक,पंढरी परब गटनेते पंढरी परब ,महिला आघाडी अध्यक्षा रेणू किल्लेकर आदी उपस्थित होते
शहरात शांतता प्रस्थापित करा
कोणत्याही स्थितीत बेळगाव शहरात शांतता प्रस्थापित करा अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे .दोन्ही समाजाच्या पंचांना एकत्रित घेऊन समन्वय समिती स्थापित करा खडक गल्ली भागात दोन्ही समजातील पंचात संवाद वाढवून शांतता निर्माण करा अशी मागणी करण्यात आली आहे. मध्यवर्ती समितीच्या शिष्टमंडळात माजी महापौर मालोजी अष्टेकर प्रकाश मरगाळे अमर येळ्ळूरकर भागोजी पाटील रामचंद्र मोदगेकर आदी उपस्थित होते . पोलीस खात्याने बिट व्यवस्थेचा योग्य वापर करून घ्यावा अशी मागणी केली .
पोलीस तपासात लोकप्रतिनिधी जनतेने सहकार्य करायला हवं कुणी दंगलखोर असेल तर त्यांचींनांवें सांगा बेळगाव शहर शांत आहे लवकरच पूर्वपदावर आणू पोलीस कारवाई सुरु आहे अशी माहिती यावेळी प्रभारी पोलीस आयुक्त आय जी पी रामचंद्र राव यांनी दिली