बेळगाव शहरात जे काही अनुचित घडत आहे, ते सारे पूर्वनियोजित आहे का असा संशय निर्माण झाला आहे.
अय्यप्पा स्वामी पूजा सुरू असताना दगडफेक होते, त्याचवेळी लाईट काढले जातात, पोलीस उशिरा पोचतात हे सारे नेमके काय आहे? दरवेळी असेच घडत असल्याने संशयाला जागा निर्माण होत असून या साऱ्या गोष्टींचा तपास लागणे महत्वाचे आहे.
बेळगावात सर्वसामान्य हिंदू मुस्लिम एक आहेत, त्यांना अशांत बनवून राजकीय स्वार्थ साधून घेण्याची तयारी आहे की दुसरेच काय आहे? याचा विचार जागरूक मंडळींनी करणे महत्वाचे वाटते.
बेळगाव हे गरिबांच महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते मात्र गेल्या काही वर्षात शहरात वारंवार होत असलेल्या जातीय तणावामुळे शहराची प्रतिमा मालिन होत चालली आहे कर्नाटकात निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे दोन्ही कडून राजकारणामुळे अश्या घटना वारंवार होत आहेत कि काय असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात पडला आह आता नवीन पोलीस आयुक्त कोण याकडे सर्वच लक्ष मात्र राजकीय दबावाला न झुगारणारा अधिकारी हवा अशी मागणी जनतेतून होत आहे . बेळगावातील राजकारणात दोन्हीकडून आगीत तेल ओतण्याचे प्रयत्न सुरु आहेत मात्र दोन्ही कडच्या युवकांनी संयम बाळगून शांतता प्रस्थापित करणे गरजेचे आहे म्हणून बेळगाव live सर्व बेळगावकर जनतेला शांततेचं आवाहन करत आहे .
Trending Now