,शांत आणि सुंदर बेळगाव शहराला सुरुंग लावणाऱ्या समाजकंटकांनी पुन्हा एकदा सोमवारी रात्री हैदोस घातला आहे. खडक गल्ली आणि परिसरात तुफानी दगडफेक, जाळपोळ आणि ऍसिड फेक करण्यात आली आहे. यामुळे सम्पूर्ण बेळगाव हादरून गेले आहे.
ही दहशत थांबण्यासाठी पोलिसांना मध्यरात्री लाठिमार आणि अश्रूधुर फोडावा लागला, बंदोबस्त करताना एसीपी शंकर मारिहाळ हे जखमी झाले.
समाजकंटकांनी अचानक ही दगडफेक सुरू करून रस्त्यावर लावलेली ४ वाहने जाळली. तसेच काही घरात शिरून मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी काहींना रात्रीच ताब्यात घेण्यात आले आहे तर काही जण फरार झाले आहेत. वारंवार बेळगाव ची शांतता भंग करण्यामागे कोण आहे याचा शोध आता पोलिसांना निपक्षपातीपणे घ्यावा लागेल, अन्यथा असे प्रकार वारंवार घडणार आहेत.