वाढत्या ट्राफिक ची समस्या आणि होणारी कोंडी रोजची आहे. आम्ही बोट करतो रहदारी पोलिसांकडे. पण एक जागरूक नागरिक म्हणून रहदारीचे नियम पाळण्याची आपली तयारी असते का?
बेळगाव शहराच्या ट्राफिक ची अवस्था अतिशय अवघड झाली आहे. ब्रिटिशकालीन रेल्वे ब्रिज पाडवल्यापासून तर ही अवस्था जास्तच वाईट आहे. काँग्रेस रोड व कपिलेश्वर ब्रिज हे रोजचे कोंडणारे भाग बनत आहेत.
पहिल्या गेटवरून मिल्ट्री महादेव पर्यंत जायला ४० मिनिटे लागली सारखे संदेश आले की या कोंडीच्या स्थितीची कल्पना येते.
रहदारी पाळण्याची सुरळीत ठेवण्याची मानसिकता कुणालाच नाही. नागरिक आणि पोलीस हे दोघेही तितकेच जबाबदार आहेत. प्रत्येक ठिकाणी रहदारीचे नियम मोडले जातात, हे लक्षात घ्यायला पाहिजे.
काही ठिकाणी प्रवेश बंद असतानाही चुकीच्या बाजूने घुसून गोंधळ करणारे वाढत आहेत. फक्त मोटरसायकल नव्हे तर मोठ्या गाड्यांचे चालकही आशा चुका करतात तेंव्हा गोंधळ जास्त वाढत आहे.
हे थांबले पाहिजे
# डाव्या बाजूने ओव्हरटेक
# गेट च्या खालून वाहन घुसवणे
# सिग्नल बंद असताना तो मोडून पुढे जाणे
# वेग मर्यादेचे उल्लंघन करणे
# नशा करून वाहन न चालवणे
# तरुणांनी भरधाव रेसिंग करणे
# झिक्झॅक स्टाईल करणे
# दोनपेक्षा अधिकजण बसून वाहन हाकणे
Trending Now