Thursday, December 19, 2024

/

आसोग्यात बुडाले  डिव्हाईन मर्सी शाळेचे दोन विद्यार्थी

 belgaum

DEvine mercyखानापूर तालुक्यातील असोगा येथील मलप्रभा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . मृत  मुले ही पिरनवाडी  येथील शाळेची विद्यार्थी आहेत .

मच्छे येथील डिव्हाईन मर्सी स्कुलची ट्रिप असोगा येथे गेली होती . यावेळी नदीतील पाण्यात खेळण्यास मुले गेली होती . पाण्यात खेळताना दोन मुले नदीत बुडाली . लगेच उपस्थित विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला . स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यात आला . बुडालेल्या मुलांना पाण्यातून बाहेर काढले पण तोपर्यंत ते मृत झाले होते .

जेम्स जॉन डिसोझा (१५),रा . भारतनगर ,हुंचेनट्टी हा विद्यार्थी दहावीत शिकत होता तर रोहन डिक्रूज (१५),रा . संभाजीनगर ,मच्छे हा विद्यार्थी नववीत शिकत होता . खानापूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.