साहित्य संमेलनात तरुण येतात . तरुण विचार मांडतात . अशा संमेलनातून तरुणांना व्यक्त होण्यास व्यासपीठ मिळते . यातूनच नवे बदल घडवायला तरुण पिढी सज्ज आहे हे दिसून येते असे पंडित म्हणाल्या . संमेलनात एकूण पाच ठराव एकमताने टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आले . यावेळी व्यासपीठावर भालचंद्र कांगो ,प्राचार्य आनंद मेणसे ,प्रा . संध्या देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते .
पत्रकार गौरी लंकेश,डॉ . एम . एम . कलबुर्गी ,डॉ . नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा लवकरात लवकर शोध लावावा ,मूलतत्त्ववादी शक्तीविरुद्ध सरकारने कारवाई करावी , उजव्या शक्तींनी सुरु केलेले इतिहासाचे पुनर्लेखन आणि विकृतीकरण थांबवावे . सीमाभागातील साहित्य संमेलने आयोजित करणाऱ्या मराठी संस्था आणि ग्रंथालये याना महाराष्ट्र सरकारने अनुदान द्यावे . अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित राहावे असे एकूण पाच ठराव संमेलनात करण्यात आले . पुढील नववे अण्णाभाऊ साठे साहित्य सम्मेलन जयसिंगपूर येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला