गेल्या दोन वर्षात कर्नाटकात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्याच्या हत्त्ये विरोधात तसेच परेश मेस्ता हत्त्ये विरोधात बेळगावात विश्व् हिंदू परिषद बजरंग दल. श्री राम सेने सह आर एस एस च्या वतीने मोर्चा काढण्यात आला . काँग्रेस सरकारच्या विरोधात शहरातील संभाजी चौकात घोषणाबाजी करत शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शन केली.
यावेळी संभाजी चौकातून किर्लोस्कर रोड सह रामदेव ;गल्ली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मेस्ता मारेकऱ्यांना त्वरित अटक करा अशी मागणी देखील करण्यात आली . गेल्या दोन वर्षात ३० हुन अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची हत्त्या झाली असून राज्यातील काँग्रेस सरकार हिंदू विरोधी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला संभाजी चौकातून कॉलेज रोड मार्गे मोर्चा काढण्याऐवजी किर्लोसकर रोड शनिवार खुंट भागातून मोर्चा काढण्यासाठी पोलीस आणि हिंदुत्वावादी कार्यकर्त्यात वाद झाला .
डी सी पी सीमा लाटकर यांच्या नेतृत्वात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता . यावेळी, आमदार विश्वनाथ पाटील श्रीनिवास बिसनकोप्प ,वीरेश कीवङसनावर भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकूनी राजू टोपाण्णावर बाबुलाल राजपुरोहित अनिल बेनके किरण जाधव रमाकांत कोंडुस्कर आदी मोर्चात सहभागी झाले होते