माजी सैनिकाने रेल्वे खाली सापडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी पहिल्या रेल्वे फाटकाजवळ घडली आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अप्पासाहेब बी डब वय 70 रा.सावरकर रोड टिळकवाडी असे मयत व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात आहे की आत्महत्त्या याबद्दल तपास सुरू आहे
बंगळुरू जोधपूर गाडी साठी पहिला रेल्वे गेट बंद असतेवेळी आप्पासाहेब यांनी ट्रॅक वर जाण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी ओरडून त्यांना बाजूला केलं होतं मात्र ट्रेन आल्यावर त्यांनी पुन्हा स्वतःला झोकुन दिल्याची माहिती मिळाली आहे.या प्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत