लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे साहित्य सम्मेलन, त्यात एक परिसंवाद, वक्ते दीपक दळवी आणि मालोजी अष्टेकर आणि अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर. समिती नेतृत्व एक व्यासपीठावर येण्याची एक संधी होती पण दळवी आले नाहीत, ते नेमक्या कुठल्या कारणाने आले नाहीत हे कळू शकले नाही.
परिसंवादाची सुरुवात मालोजी अष्टेकर यांनी केली. अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत एकी आजही पाळण्याची गरज त्यांनी मांडली. साठे यांच्या जीवन कार्याचा परिचय त्यांनी करून दिला. दीपक दळवी आले नसल्याने ऐनवेळी प्राचार्य आनंद मेनसे यांना वेळ मारून न्यावी लागली त्यांनी एक कॉम्रेड म्हणून जगलेल्या अण्णाभाऊंच्या आणि त्यांच्या बेळगाव भेटीच्या अनेक गोष्टी यावेळी सांगितल्या.
किरण ठाकूर यांनी सम्पूर्ण सीमाप्रश्नाचा आढावा घेताना ही प्रामाणीक चळवळ आहे, यात गद्दारी करणाऱ्या व्यक्तींना जनताच धडा शिकवते याचे स्मरण करून दिले.
Trending Now