बेळगाव महापालिका आणि कॅटोंमेंट बोर्ड व्याप्तीत सर्व जाहिरात होल्डिंग्स आणि दुकानां वरील फलकावर 75 टक्के कन्नड भाषेची सक्ती करा अशी मागणी कन्नड वेदिकेने केली आहे.
गुरुवारी चनम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत कन्नड वेदिकेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ही मागणी केली आहे.
जे दुकानदार फलकांवर कन्नड भाषेला 75 टक्के प्राधान्य देत नाहीत अश्या दुकानांचे परवाने रद्द करा कन्नड प्राधिकरणा च्या या आदेशाचे कॅटोंमेंट आणि महा पालिका पालन करत नाही त्यामुळे इतर भाषिका कडून कन्नड भाषेचा अपमान केला जातोय अस देखील वेदिकेने निवेदनात म्हटले आहे.