मराठा क्रांती मोर्चातील निवेदनात आयोजकानी थेट राष्ट्रपतींकडे सीमाप्रश्न सोडवणुकीची मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावा करण्याची सूचना राष्ट्रपती कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाला झाला होता, त्यावर उत्तर देताना या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आले आहेत असे नेहमीचेच सांगून बोळवण करण्यात आली आहे.
असे पत्र महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव स कृ भोसले यांनी आयोजक प्रकाश मरगाळे यांना पाठविले आहे.
महाराष्ट्र शासनाने दावा दाखल केला आहे, तज्ञ वकील वर्ग त्यासाठी नेमला आहे, याची कल्पना ही मागणी करणाऱ्या सर्व आयोजकांना द्यावी, एवढेच उत्तर अपेक्षित नव्हते, मात्र तितकेच उत्तर आल्याने त्यावर समाधान मानण्याची वेळ आली आहे.
Trending Now