बेळगावच्या मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातुन बेपत्ता दोन मुलीना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही मुली सुरक्षीत असून नोकरीच्या शोधात त्या मुंबईतून गेल्या होत्या, अशी माहिती डीसीपी सीमा लाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
बाळेकुंद्री येथून मुली बेपत्ता झाल्यानंतर अनेक प्रकारच्या उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते . मात्र पोलिसांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत या प्रकरणात दोन्ही मुलींना शोधून काढले असून दोन्ही मुली या सुरक्षित असून यापैकी एकीचे वय 21 आणि दुसऱ्या मुलीचे वय 24 आहे.
” मुली मुंबईतून परत आल्या नव्हत्या. त्यामुळे याचा तपास घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. दोन्हीपैकी एक मुलगी नेहमी डायरी लिहीत होती. त्या डायरीतुन मुली कुठे जाऊ शकतात, त्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर दोघींना मुबंई येथून ताब्यात घेतल आहे. दोन्ही मुली बेळगाव येथून 6 डिसेंबर पासून बेपत्ता होत्या. जाताना त्यांच्याकडे 2 हजार रुपये होते. पैसे घेऊन येथून त्या रेल्वेने मिरज गाठले आणि तेथून त्या मुंबईला गेल्या, अशी माहिती देखील लाटकर यांनी दिली आहे