होन्नावर मध्ये झालेल्या परेश हत्त्या प्रकरणात राज्य सरकारच्या कृतीचा निषेधार्थ 17 डिसेंम्बर रोजी बेळगावात निदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती खासदार सुरेश अंगडी यांनी दिली.
बेळगाव भाजप महा नगरच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत भाजपच्या वतीने ही माहिती दिली. परेश हत्त्ये प्रकरणात राज्य सरकारने शव विच्छेदन अहवालात फेरफार करून रिपोर्ट लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
पी एफ आय संघटनेचे आय एस आय संबंध असल्याची शंका आहे त्यामुळे राज्य सरकारने या संघटनेवर बंदी घालावी अशी देखील करण्यात आली आहे.
6 रोजीचं परेश मेस्ता चा मृत्यू झाला 7 रोजी मुख्यमंत्री कारवार दौऱ्यावर असल्यानेच त्याच शव लपवून ठेऊन 8 रोजी बाहेर काढला असा आरोप देखील करण्यात आला.पत्रकार परिषदेत भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकुनी, किरण जाधव,राजू टोपन्नावर आदी उपस्थित होते.