गेल्या तीन आठवड्यापासून बेळगाव live ने आगामी विधान सभा निवडणूक समोर ठेऊन सोशल मिडीयात कार्यरत जनतेचा पहिला ओपिनियन पोल घेतला आहे . त्याचा सध्या असलेला ट्रेंड आम्ही जाहीर करत आहोत. निवडणूक अजून सहा महिने लांब असली तरी खूप लवकर आम्ही हा सर्व्हे केलेला आहे भविष्यात यातील ट्रेंड बदलू देखील शकतात. यापुढे वेळोवेळी आम्ही ओपिनियन पोल, एक्झिट पोल, सर्व्हे घेणार आहोतच.
असा आहे ट्रेंडआमच्या पहिल्या सर्व्हेत सोशल मिडीयावर असा ट्रेंड आहे एकूण 2002 जणांनी यात मतदान केलेलं असून जवळपास ७६.६% टक्के पुरुष तर १९.८ %टक्के महिलांचा सहभाग आहे.
३० ते ४० वयोगटातील २५ टक्के लोकांचा सहभाग ४१ ते ५० वयो गटातील २६.३ %, २६ ते ३० वयोगटातील २१ टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे.चार मतदार संघात कोण होऊ शकतात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ?
३७.१% टक्के लोकांनी बेळगाव दक्षिण साठी मतदान केलय तर
३५.८ % टक्के मतदान बेळगाव ग्रामीण साठी करण्यात आलय
१७.१ % टक्के बेळगाव उत्तर साठी तर
१० %टक्के मतदान खानापूर साठी करण्यात आलंय
बेळगाव उत्तर – २९८ जणांनी मतदान केलय
२८.९ % टक्के अमर येळ्ळूरकर – ८६ मत
१८.१ % टक्के संभाजी पाटील- ५४ मत
१५.८ % टक्के रेणू किल्लेकर- ४७ मत
६ % टक्के किरण सायनाक – १८ मत
विशेष – मदन बामणे (४ ),रमाकांत कोंडुसकर(७) भाजप या नावाना देखील एक दोन अशी मत मिळाली आहेत आम्ही नाव समाविष्ट न करता देखील ही नाव सर्व्हेत मतदानात आली आहेत.
खानापूर – १९३ मत
६१.१ % टक्के अरविंद पाटील -११८ मत
१७.१ % टक्के दिगंबर पाटील- ३३ मत
१५.५ % विलास बेळगावकर – ३० मत
विशेष – या मतदार संघात देखील ,पुंडलिक कारलगेकर अश्या अनेक नावानं एक दोन मत पसंती मिळाली
बेळगाव दक्षिण साठी ६८७ जणांनी केलंय मतदान
५६ % टक्के सरिता पाटील – ३८५ मत
१९.८ % टक्के प्रकाश मरगाळे- १३६ मत
८.६% टक्के संभाजी पाटील -५९ मत
२.३% टक्के नागेश सातेरी -१७ मत
विशेष – नाव न समविष्ट करता काहीना मतदान झालेलं आहे , विनायक गुंजटकर,मनोहर होसुरकर,दीपक दळवी ,महेश नाईक ,नोटा आणि अभय पाटील यांच्या नावाने एक दोन अशी मत आलेली आहेत
बेळगाव ग्रामीण ६८१ जणांनी केलय मतदान
४२.३ %टक्के सरस्वती पाटील -२८८ मत
३५.२% टक्के मनोहर किणेकर- २४० मत
१४.८ टक्के भाऊ गडकरी – १०१ मत
०.४ % टक्के एस एल चौगुले – ३ मत
विशेष – ग्रामीण मतदार संघात –सुनील अष्टेकर रामचंद्र मोदगेकर,मोहन मोरे, संजय पाटील आदिना एक दोन जणांनी पसंदी दिली आहे. यापैकी संजय पाटील वगळता इतर समितीचे आहेत.