क्षुल्लक कारणामुळे आई आणि मुलात वाद होऊन झालेलया भांडणात पोटच्या मुलाने आईच्या डोकीवर कुऱ्हाडीने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. गंभीर जमखी आईला उपचारा साठी बेळगावातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे .
हुक्केरी तालुक्यातील कमतनूर गावातील ही घटना असून ज्योती माळी वय ३८ असं गंभीर जखमी झालेल्या दुर्दैवी मातेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी घरी असतेवेळी आई मुलात क्षुल्लक कारणावरून वाद झाला यावेळी झालेल्या वादात मुलाने कुऱ्हाडीने आईच्या डोक्यावर जोरदार हल्ला चढवला त्यात ज्योती गंभीर जखमी झाल्या आहेत .
लागलीच उपचार साठी त्यांना बेळगावातील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दखल करण्यात आले आहे . संकेश्वर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.