उत्तर कर्नाटकाला सर्वात आधी वेगळ्या राज्याचा मागणीचा दर्जा देण्याची मागणी करणारे माजी मंत्री उमेश कत्ती यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे बेल्लद बागेवाडी येथे एक वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखातीत भाजप पक्षाला शिवीगाळ केलं असल्याचं वृत्त कानडी वृत्त वाहिन्यानी चालवलं होत मात्र या आपल्या वक्तव्यावर पुन्हा त्यांनी माघार घेत पक्षाला शिवीगाळ केली नसून पत्रकारांनी माझी मुलाखात चुकीच्या पद्धतीने दाखवली असल्याचा स्पष्ट केलं आहे .भाजप सोडण्याच्या प्रश्नच उद्भवत नसल्याचं देखील म्हटलं आहे
बेळगाव जिल्ह्यातील लिंगायत समाजातील एक मोठं नेतृत्व म्हणून उमेश कत्ती यांच्याकडे पाहिलं जातंय . कत्ती यांनी आगामी विधान सभेत माझं तिकीट कट होईल म्हणून मी लिंगायत वेगळ्या धर्माच्या मोर्चात आपण सामील झालो नसून तशी सूचना पक्ष श्रेष्ठींनी दिली होती असं देखील यावेळी म्हटलं होत.मी वेगळा आंणूस आहे भाजपचा अजेंडा वेगळा आहे भाजपचं माझं कधी जमलंच नाही म्हणत अर्वाच्य शब्दात पक्षाला शिवीगाळ केली होती.
माझ्या मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या जीवावर असून पक्षाच्या जीवावर कधीच नाचत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं होत .आधी शिवीगाळ नंतर माघार या कत्ती स्टाईल मुळ साताऱ्याचे खासदार उदयन राजे भोसले यांची किंचित चुणूक त्यांच्यात दिसली आहे
एकीकडे पक्षला शिवीगाळ करणे अन दुसरीकडे दिलगिरी व्यक्त करत तो मी नव्हेच या भूमिके बद्दल अनेक उलट सुलट चर्चा होत असून कत्ती काँग्रेसच्या संपर्कात देखील आहेत असं देखील बोललं जात आहे .