डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्यास 24 लाख रुपये लुटल्याची घटना गांधीनगर हायवे सागर हॉटेल जवळ घडली आहे. तुमकुर च्या फुल व्यापाऱ्यांस सोमवारी रात्री बारा च्या लुटण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे
न्यू गांधी नगर येथील फुल व्होलसेल मार्केट मध्ये चित्रदुर्ग चा असलेला नारायण नावाचा फुलांचा व्यापाऱ्यावर हा प्रसंग ओढवला आहे. बेळगावातील फुलांचे पैसे कलेक्शन करून चित्रदुर्ग ला जाण्यासाठी ते हायवे वर थांबले होते त्यावेळी दुचाकी वरून आलेल्या दोघांनी चाकू दाखवून डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्या जवळील लाखो रुपये लुटले आहेत.दर महिन्यातून एकदा ते बिल कलेक्शन साठी बेळगाव ला येत असतात. मार्केट पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.