अळवन गल्ली दगडफेक प्रकरणात पोलिस आपलं काम व्यवस्थित करत असताना असताना एका माजी लोक प्रतिनिधींनी सहकाऱ्या कडून गोंधळ घालणे चुकीच आहे . रस्त्यावर बसून गोंधळ घालायचा असेल तर त्या दिवेशी रात्री हे कुठे गेले होते असा सवाल सामाजिक कार्यकर्ते राजू सुतार यांनी केला आहे . मंगळवारी दुपारी शहापूर पोलीस स्थानकात आयोजित सर्व धर्मीय शांतता सभेत ते बोलत होते.
पोलीस सहकार्य करत असताना रस्त्यावर गोंधळ घालण्याचा प्रकार चुकीचा असल्याचा असा सूर शांतता समितीच्या बैठकीत निघाला. यावेळी ए सी पी शंकर मारीहाळ आणि पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी शांतता राखून पोलीसाना सहकार्य करावे असे आवाहन केले.
पोलिसांनी दोन्ही गटाच्या अधिक लोकांना अटक न करता आपली भूमिका योग्य करत असतेवेळी राजकारण करणाऱ्यांनी स्टट करणे चुकीचे आहे अस भाजप नेते पांडुरंग धोत्रे यांनी तर या पूर्वी प्रमाणे गलीतील पंच स्थानिक पोलिसांनी असली वाद सामोपचाराने मिटवणे गरजेचे असून सर्वांनी शांतता राखावी असे नगरसेवक रमेश सोंटककी म्हणाले. सुनील चौगुले,इम्तियाज बेपारी,रशीद चिकोडी, रियाज शेख, अब्दुल गणी बागलकोटी,अमजद मोमीन,दीपक वाघेला, आदी उपस्थित होते.