पोखरण येथील फायरिंग रेंज येथे कार्यरत बेळगावच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे.
संतोष बाकडू असे त्याचे नाव आहे. फायरिंग रेंज मध्ये अचानक गोळीचा आवाज झाला. सहकारी जवानांनी पाहिले असता संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, त्याला उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
त्याचे वय अवघे ३८ आहे. तो विवाहित असून काही घरगुती कारणांनी त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा मृतदेह पोस्ट मार्टम नंतर लष्करी अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.