जसजशा निवडणूका जवळ येत आहेत तसे दंगली माजवून राजकीय फायदा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी कायदा व सुव्यवस्था राखून ठेवण्यासाठी बेळगावला सक्षम पोलीस अधिकारी म्हणजेच आयुक्त नेमण्याची गरज आहे.
पोलीस आयुक्त कृष्णभट्ट सेवा निवृत्त झाले अमरनाथ रेड्डी यांची बदली झाली आयुक्तांचा पदभार आयजीपी कडे आहे.याच स्थितीचा राजकीय फायदा घेऊन जे गोंधळ माजवतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सक्षम आणि जबाबदार अधिकारी हवे आहेत.कोणत्याही राजकीय नेत्यांचं न ऐकता स्वतंत्र काम करणाऱया अधिकाऱ्यांनी गरज आहे.पोलीस आयुक्त सक्षम अधिकारी हवाच या शिवाय खडे बाजार आणि मार्केट पोलीस निरीक्षक आक्रमक पाहिजेत तरच बेळगाव शांत होण्यास मदत होणार आहे.
बेळगाव शहर हे बाजाराचे केंद्र आहे. येथे खरेदीसाठी गोवा व महाराष्ट्रातून नागरिक येत असतात. अशावेळी कायम अशांत वातावरण निर्माण होणे बाजारपेठेसाठी पोषक नाही. खरेदीवर परिणाम होऊन उलाढाल मंदावण्याचा धोका आहे. यासाठी समाजकंटकांवर वेळीच आवर घालणे तितकेच महत्वाचे आहे.
राजकीय फायद्यासाठी काही लोक असे प्रकार करत आहेत. हिंदू आणि मुस्लिम बांधवात विनाकारण तेढ निर्माण करून आपला स्वार्थ साधून घेण्याचा प्रयत्न दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदारसंघात आत्तापासून सुरू झाला आहे.हे ओळखून पोलीस दलाने वेळीच सावध होणे आवश्यक आहे.
आयुक्त पदावर सक्षम अधिकारी नेमून पोलीस दल बळकट करणे यासाठी सरकारने हालचाली कराव्यात अशी मागणी जनता करत आहे.