रविवारी रात्री कामत गल्ली भागात दगडफेक झाल्याने काही वेळेसाठी तणावाच वातावरण निर्माण झालं होतं.
तीन ऑटोची मोडतोड करण्यात आली होती घटनास्थळी तातडीने पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
या अगोदर शहापूर भागात लग्नाच्या वरातीवर दगडफेक केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं या दोन्ही घटना वेगवेगळ्या असून एकमेकांत याचा संबंध नसल्याची माहिती पुढं येत आहे.शहरात रात्रभर पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
बेळगाव शांत राखुया
शहरात काही ठिकाणी काही समाजकंटकांनी गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस त्यावर नियंत्रण आणत आहेत. अशावेळी शांतता कायम राखून अफवा न पसरविता अफवांवर विश्वास न ठेवणे आणि शांतता राखणे हे आपले कर्तव्य आहे.
बेळगावची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न काही दिवसांपासून होत आहे. समाजकंटक तसे प्रकार करत आहेत. जातीय किंवा इतर वाद उफाळून आणून दंगली माजवणे हा उद्देश आहे.
तो उद्देश साध्य होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून कोणत्याही परिस्थितीत तणाव वाढेल असे कृत्य न करता शांतता राखुया, हीच विनंती बेळगाव live करीत आहे.