दक्षिण मतदार संघातून एकीकडे भाजपकडून विणकर समाजाला उमेदवारीची मागणी होत असताना याबाबत कॉंग्रेसनेच विणकर समाजाला उमेदवारी देण्या संदर्भात हालचाली सुरु केल्या आहेत. विणकर समाजाचे राज्याचे नेते विधान परिषद सदस्य एम डी लक्ष्मी नारायण यांना कॉंग्रेसमधून उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
गेल्या तीन निवडणुकात बेळगाव दक्षिणेत कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने स्थानिक नेत्यांना उमेदवारी दिल्यास होणारी वाताहात थांबवण्यासाठी विणकर समाजाची एक गट्टा मत मिळवण्यासाठी हा प्रयत्न होत आहे. या विधानसभा मतदार संघात जवळपास ४० हजारहून अधिक विणकर मत आहेत या मतावर कॉंग्रेसचा डोळा आहे त्यामुळेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एम डी लक्ष्मी नारायण यांना दक्षिणेत काम करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसारच लक्ष्मी नारायण गेले काही दिवस बेळगावातच ठाण मांडून आहेत त्यांनी विणकरा साठी काम देखील सुरु केलेले आहे. गेले दोन दिवस लक्ष्मी नारायण यांनी जन संपर्क दौरा सुरु केला होता गणेशपूर गल्ली शहापूर, अनगोळ, पिरनवाडी, झटपट कॉलनी,सर्किट हाऊस या भागात त्यांनी बैठका लावल्या होत्या.मैसूर जवळील मूळ तावरेकेरे गावचे असलेले लक्ष्मी नारायण यांना खासबाग वडगाव भागातील विणकर समाजातील प्रत्येक घरात ओळख आहे त्यांना मनच स्थान आहे गेल्या २० वर्षाहून अधिक काळ त्यांनी विणकर समाजासाठी कार्य देखील केल आहे या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न घेण्यास कॉंग्रेस हायकमांड विचार करत आहे.राज्य सरकार कडून विणकराना मिळालेली कर्ज माफी करण्यात लक्ष्मी नारायण यांचा मोलाचा वाटा आहे या शिवाय वाघवडे किंवा बेक्कीनकेरे एवजी कित्तूर जवळ ८६ एकर जमिनीत विणकरा साठी टेक्सटाइल पार्क साठी प्रयत्नशील आहेत.
एक गट्टा विणकर मते त्याच प्रमाणे पारंपारिक मत सह कॉंग्रेस इथे प्रभावी ठरू शकेल असा पक्ष श्रेष्ठींचा होरा आहे आगामी चार महिन्यात आठवड्यातील तीन दिवस दक्षिण भागात जन संपर्क अभियान राबवून लोकांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत तसे थेट आदेश मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले असल्याची माहिती देखील बेळगाव live कडे मिळाली आहे. लवकरच हिंदवाडी भागात ते वास्तव्यास देखील असणार आहेत त्यामुळे दक्षिण मतदार संघात आणखी चुरस वाढली आहे.
मंत्री उमाश्री या देखील विणकर समाजाच्या आहेत त्या तेरदाळ मधून निवडणूक लढवत असतात राज्याभरातील सर्व विणकर समाजातील नेते त्यांच्यासाठी निवडणुकीत राबत असतात त्याच पद्धतीने बेळगाव दक्षिण मधून एम डी साठी फिल्डिंग लावली जात आहे.
माझया मते भाजपचाच तेही विणकराचा उमेदवार मिळणारच,पहा आणी उभे करून निवडून आणावा.कारण केंदरात सता भाजपाचा आहे.