आगामी विधान सभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील एकूण १८ विधानसभा मतदार संघापैकी दहा जागा निवडून आलो नाही तर राजकीय निवृत्ती घेईन असा वक्तव्य राज्याचे सहकारी आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केलं आहे . पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला होते . आगामी विधान सभा निवडणुकीच्या सहा महिने अगोदरच काँग्रेसने अशी वक्तव्य करत माईन्ड गेम खेळायला सुरुवात केली आहे . पुढील निवडणुकीत दहा आमदार जर निवडणून आलो नाही तर माझ्यात राजकीय सामर्थ्य उरले नाही असं समजून घ्या हाय कमांड ने दिलेल्या जबाबदारी बद्दल पत्रकारांनी छेडलं असता त्यांनी हे वरील वक्तव्य केले आहे .
मुख्यमंत्री पदाचा मान ठेवा
माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हे निराश भावनेने सिद्धरामय्या वर एक वचनी टीका करत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा मान राखून बोलावं असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे . भाजपचे राजकारण दक्षिणात्य राज्यातून चालणार नाही त्यामुळे त्यांची परिवर्तन यात्रा अयशस्वी झाली आहे परिवर्तन यात्रा फेल झाल्यानेच येडियुरप्पा यांची मानसिकता बिगडली आहे त्यातूनच ते अशी वक्तव्ये करत आहेत असा देखील जारकीहोळी म्हणाले . काँग्रेस नेत्यावर अजूनही दहा आय टी रेड केल्या तरी काहीही फरक पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं .
या पेज के नाव बेलगाम live पेक्षा कांग्रेस live ठेवा.