स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झालेल्या बेळगावात शहरात अखेर काम सुरु झाली आहेत पहिल्या टप्प्यात रस्ते दुरूस्त कामे हाती घेण्यात आले आहे.नेहरूनगर ते केपीटीसीएल या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.असून 705 फूट लांब आणि 24 फूट रुंद रस्ता बनविला जात आहे. काँग्रेस रोड आणि मंडोळी रोड रस्त्याचे काम ही हाती घेण्यात आले आहे. पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केपीटीसीएल रस्त्यांची औपचारिकरीत्या भूमी पूजन करून सुरुवात केली .
स्पेशल परपज सायकल योजना सुरू होण्यासाठी विविध अडचणी येत होत्या. पण, आता त्याला चालना मिळेल. तसेच . 940 लांब आणि 24 फूट हा रस्ता आहे.दोन्ही रस्त्यासाठी 22.39 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. केंद्र सरकार आणि स्मार्ट सिटी योजनेखाली काम सुरू आहे. पादचारी, सायकल रोड, अंडर ग्राउंड पाणी पुरवठा, एलईडी दिवे आणि वीज व्यवस्थापण आदी कामे हाती घेतली जाणार आहेत.जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, महापालिका शशिधर कुरेर आणि आमदार फिरोज सेठ उपस्थित होते.