मुलाला नोकरी का दिली नाही असा जाब विचारत एका बापाने हिंडाल्को कार्यालयावर दगडफेक करून नुकसान केल्याचा प्रकार शनिवारी घडला आहे. होळीयाप्पा दड्डी (४८) रहिवाशी मुत्त्यानटटी अस माळ मारुती पोलिसांनी अटक केलेल्या बापाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार होळीयाप्पा याचा आय टी आय पूर्ण केलेल्या मुलाने नोकरीसाठी हिंडाल्को कंपनीत मुलाकात दिली होती मात्र त्याचे नोकरीसाठी निवड झाली नसल्याने मनात राग ठेवलेल्या होळीयाप्पा याने शनिवारी इंडालनगर येथील हिंडाल्को कंपनीच्या कार्यालयात जाऊन तिथल्या कर्मचाऱ्याना शिवीगाळ करून दगडफेक करून काचांचे नुकसान केल आहे. दगडफेकीत इमारतीचे जवळपास २ लाखाचे नुकसान झाल्याची तक्रार कंपनीने पोलिसात दिली आहे.