रहाणी अत्यंत साधी असली तरी रमाकांत आचरेकर यांच्या सारखीच मनात जिद्द बाळगून रोहन कोकणे यांच्या सारखे अनेक जागतिक दर्जाचे स्केटिंग खेळाडू तयार करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीचे कोच सूर्यकांत हिंडलगेकर हे जायंट्स फेडरेशन च्या पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. मागील २० वर्षांपासून स्केटिंग प्रशिक्षण देऊन अनेक खेळाडूंना तयार केल्या बद्दल हा सन्मान झाला.बेळगाव शहरांच आव स्केटिंग मध्ये देश विदेशात प्रसिद्ध होण्यात सुर्यकांत याच योगदान खुप मोलाच आहे.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव आणि सहेली तर्फे झालेल्या शानदार समारंभात त्यांना गौरवण्यात आले आहे. शाल, स्मृतिचिन्ह आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी चे प्रमुख उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, मधुकर बागेवाडी, कमल किशोर जोशी यांची प्रेरणा त्यांना लाभली आहे.