बनावट कागदपत्रे तयार करून बेळगावच्या ऑटो नगर येथील कत्तलखान्यात काम करत धुळफेख करणाऱ्या त्या १२ बांगलादेशींची रवानगी त्यांच्या देशात करण्यात आली आहे.
स्थानिक पोलिसांनी त्यांना अंतर्गत सुरक्षा विभागाकडे सोपवले असून त्या पथकाने त्यांना बांगलादेशला पाठवले आहे.
या १२ जणांनी कत्तलखान्यात काम करताना आधार आणि रेशन कार्डे मिळवून घेतली होती. तर काहींनी पासपोर्टही मिळवले होते.
एजंट वर्गाने एक खासगी हॉस्पिटलच्या नावे त्यांचे जन्मदाखले बनवून ही सोय केली होती. पोलिसांनी त्या हॉस्पिटलचे नाव उघड केले नाही, शोध कार्यात आणखी मुळापर्यंत जाण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती.
Auto nagar ethe ajun sudha bangladeshi vastav karat ahet