बेळगाव नगरीत १६,१७ डिसेंबर रोजी होणारे आण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी शनिवार ता २ रोजी शहीद भगतसिंग सभागृहात बेळगाव मार्ग संस्थेची बैठक झाली.अध्यक्षस्थानी अशोक पोतदार होते.
सुरुवातीला कृष्णा शहापुरकर यांनी प्रास्ताविक केले, आणि आजच्या बैठकीचा उद्देश सांगितला, या बैठकीत साहित्य संमेलनाबरोबरच सध्या हुतात्मा चौक व कडोलकर गल्लीचे मास्टर प्लॅन झालेले आहे, त्या ठिकाणी मार्ग संस्थेच्या वतीने कडोलकर गल्लीतील व्यापारी व नागरिकांच्या सहकार्याने गल्लीचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अध्यक्ष अशोक पोतदार यांचे ७५ व्या वर्षात पदार्पण झाल्या कारणाने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महादेव पाटील,मधु पाटील,चिमन जाधव, गुरुनाथ भादवणकर,अजित हिंडलगेकर, अनंत लाड,नगरसेविका माया कडोलकर ,सदानंद सामंत,यांनी चर्चेत भाग घेतला, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी,डी बी पाटील,शिवराज पाटील,विकास कलघटगी, उपस्थित होते.