अबकारी पोलिसांकडून सुरु असलेल्या कारवाई वेळी विहिरीत पडून युवक ठार झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील हिंडलगा गावाजवळ घडली आहे . शनिवारी सकाळची ही घटना असूनअबकारी पोलिसांकडून नकली दारू भट्ट्या रेड घातली असता आरोपी युवकाचा पाठलाग करतेवेळी सोनट्टी गावाचा आडव्याप्पा सिद्धाप्पा मुचंडी हा युवक विहिरीत पडून ठार झालं आहे .
अबकारी पोलिसांनी आडव्याप्पा याचा खून करून विहिरीत मृतदेह टाकून दिल्याचा आरोप करत अबकारी पोलिसावर दगडफेक केली होती या घटने नंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. सोनट्टी ग्रामस्थांनी एकनाथ नावाच्या अबकारी पोलिसांवर प्राणघातक हल्ला करून जखमी करून अबकारी पोलिसांच्या कार तोडफोड केल्याची घटना देखील यावेळी घडली आहे. घटना स्थळी काकती पोलीस निरीक्षक रमेश गोकाक पोलीस बळा सह घटनास्थळी बंदोबस्त ठेवेला आहे मयत युवकाचा मृतदेह शव चिकित्सेसाठी पाठवण्यास देखील ग्रामस्थांनी अडवणूक केली होती घटना स्थळी तणावपूर्व स्थिती निर्माण झाली आहे .