देशातील पहिली महिला आय पी एस अधिकारी मान मिळवलेल्या किरण बेदी या पोदूचेरी च्या लेफ्ट गव्हर्नर आहेत त्या आज बेळगावला आल्या होत्या.सांबरा विमान तळावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
जिल्हाधिकारी एस जिया उल्ला,जिल्हा पंचायत सी इ ओ रामचंद्र राव,पोलीस उपायुक्त सीमा लाटकर,अमरनाथ रेड्डी,प्रांताधिकारी कविता योगप्पन्नावर आदींनी बेदी यांच स्वागत केलं.हुबळी येथील कार्यक्रमात जाण्यासाठी त्या विमानाने बेळगावला आल्या होत्या तिथून रस्त्याने हुबळीला रवाना झाल्या.बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं शिष्टाचार पूर्वक स्वागत केलं