जनावरांना देण्यास बंदी असलेलं ऑक्सीटोसींन मिश्रित इंजेक्शन विकणाऱ्या कोनवाळ गल्लीतील एका गवळीस पोलीसांनी अटक करून त्याच्याजवळील 73 हजार किंमतीचे औषध जप्त केली.
गंगाधर सिद्धप्पा गवळी 42 कोनवाळ गल्ली बेळगाव यांच्या घरात धाड टाकून वरील ऑक्सीटोसींन मिश्रित औषध जप्त केली आहे.पोलीस विभाग औषध नियंत्रण खात्यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त कार्यालयात उपायुक्त सीमा लाटकर आणि औषध नियंत्रण खात्याचे अधिकारी दीपक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत वरील कारवाईची माहिती दिली.
अधिक दूध काढण्यासाठी जनावरांना ऑक्सीटाईन मिश्रित इंजेक्शन देण्यात येत होते महाराष्ट्रातील पुणे येतून 30 रुपयांना एक इंजेक्शन आणून 120 रुपयांना विक्री करत होते अशी देखील माहिती यावेळी देण्यात आली.
सदर इंजेक्शन मुळे जनावरांना अनेक रोग होऊ शकतात त्या जनावरांचा दूध पिणाऱ्या लहान बाळाना देखील अपाय होतो त्यामुळे हे इंजेक्शन म्हशी जनावरांना देण्यास बंदी आहे अशी माहिती सीमा लाटकर यांनी दिली आहे.
Trending Now