अंतराळ यानासाठी उपकरण बनवणाऱ्या सर्वो कंट्रोल या कम्पनीत कामगारांची अतोनात छळवणूक होत असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.काही कामगारां वर गुन्हे घातल्या वर कामगारांच्या घरी जाऊन रात्री अपरात्री छळवणूक करण्याचा सपाटा कम्पनी व्यवस्थापनाने चालवला आहे अशी देखील तक्रारीत म्हटलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून द्यावा अस देखील पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
उद्यमबाग पोलीस स्थानकात गेल्या महिन्यात एक प्रकरण दाखल करण्यात आले आहे काही कामगारांची चौकशी करण्यात आली आहे याचं प्रकरणात इतर कामगारानाही त्रास दिला जात असल्याच तक्रारीत म्हटलं आहे.पोलीस देखील याचा तपास करतेवेळी कायदा सोडून वागत आहेत संबंध नसलेल्या कामगारांना त्रास देत आहेत.काही कामगारांचा संबंध नसताना देखील कामगारांकडून जबरदस्तीनं स्टँप पेपर वर लिहून घेण्यात आले असून गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे यासाठी एक राजकीय नेता आणि उद्योजकाचा वापर होत असल्याच तक्रारीत म्हटलं आहे.
सर्वो कंट्रोल चे दीपक धडोती ज्योती धडोती यांच्यावर कारवाई करा अस देखील तक्रारीत म्हटलं आहे
Trending Now