भारताचे पहिले ऑलिम्पिक मॅरेथॉन धावपट्टू होते आपल्या बेळगावचे फाडेप्पा दरेप्पा चौगुले. १९२० साली बेल्जियम येथील अँटवर्प येथे झालेल्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
२ तास ५० मिनिटे ४५.२ सेकंदात धाव पूर्ण करून ते १९ वे आले होते. ९७ वर्षे पूर्वीची ही गोष्ट आहे. १९२० मध्ये भारताने प्रथमच ऑलिंपिकमध्ये भाग घेतला होता.२२ ऑगस्ट रोजी ही स्पर्धा झाली होती, त्यात चौगुले यांनी केलेली कामगिरी मैलाचा दगड ठरली आहे.
चौगुले यांचा जन्म १९०२ मध्ये शेरी गल्ली येथे शेतकरी कुटुंबात झाला. या मॅरेथॉन साठी बेळगाव ते खानापूर मार्गावर अनवाणी धावून त्यांनी सराव केला होता. पुढे १९५२ साली त्यांचा मृत्यू झाला.
ते १०००० मीटर चे अंतर सर्वात आधी कापू शकले नाहीत मात्र पहिल्या तीसमध्ये आल्यामुळे त्यांना डिप्लोमा ऑफ मेरिट किताब देऊन गौरवण्यात आले होते.