हलकर्णी (ता.चंदगड) येथे काल दिवसभर हत्तींनी धुमाकुळ घातला. ऊसाच्या शेतामध्ये हत्ती शिरल्यामुळे ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात पाच हत्तींचा कळप असल्याने हलकर्णी गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. यावेळी हलकर्णी गावातील ग्रामस्थ हे हत्तींना हुसकावण्याचा प्रयत्न केला असता हत्ती थेट त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच लवकरात लवकर हतींचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे इथल्या ग्रामस्थांनी सांगितले. कारण कांही वर्षापूर्वी हत्तींनी केलेल्या हल्ल्यामुळे चंदगडमधील कांहीनी आपले जीव गमावले आहेत. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे असल्याचे, मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
Trending Now
Less than 1 min.
Previous article