कचरा घेण्यासाठी घरोघरी गाड्या फिरत असताना रस्त्या शेजारी कचरा टाकणे जाळणे असे प्रकार घडताहेत या विरोधात कॅटोंमेंट बैठकीत निर्णय घेण्यात आला असून इथून पुढे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
कॅटोंमेंट बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.ब्रेगेडियर गोविंद कलवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.रेल्वे स्टेशन बस स्थानकात इंदिरा कॅन्टीन ला भाडे तत्वावर जागा देणे,कॅटोंमेंटचे हॉस्पिटल डॉक्टर क्वाटर्स मध्ये न राहता खाजगी घरात रहात असल्याने रुग्णांना याचा त्रास होत असून डॉक्टरांना नोटीस देणे बेऊर रोड येथे स्वच्छता घर उभारणे,इमारत बांधकाम नियमावली मंजुरी देऊन शासनाकडे पाठवणे आदी निर्णय घेण्यात आले.कॅटोंमेंट सी इ ओ दिव्या शिवराम, सर्व छावणी सीमा परिषद सदस्य देखील बैठकीत हजर होते
Trending Now