स्वतःच्या आत्यानेच पाच वर्षीय बालिकेचा रॉकेल ओतून निर्दयीपणे खून केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील हिरेबळीकट्टी गावात घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी निर्मला(23) नावाच्या मयत बलिकेच्या आत्यास पोलिसांनी अटक केली आहे.
राजेश्वरी वय पाच वर्षे दुर्दैवी बालिकेचे नाव असून गेल्या 27 नोव्हेंम्बर रोजी ही घटना घडली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरेबळीकट्टी गावात घरा समोर खेळत असलेल्या पाच वर्षीय बालिकेस शेतात मल विसर्जित करण्यास घेऊन जाऊन पाण्याच्या तांब्यातल रॉकेल नेऊन खेळत असताना तिला जिवंत जाळल्याची घटना घडली होती.पोलिसांनी राजेश्वरी आगीत कस भाजून मृतक झाली याचा अधिक तपास केला असता तिचीच आत्या असलेल्या निर्मलाने तिला जाळून मारल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
पाच वर्षीय बालिकेने निर्मला एकट्या सोबतचे अनैतिक संबंध बघितले होते अनेकदा ती निर्मला बद्दल तक्रारी घरी सांगायची म्हणून तिने चिमुकलीला जाळून मारल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे.दोडवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.