येत्या 9 ते 13 डिसेंम्बर रोजी सी पी एड मैदानावर होणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा या महा नाट्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.बुधवारी सकाळी महापौर संज्योत बांदेकर उपमहापौर नागेश मंडोळकर सह कॅटोंमेंट उपाध्यक्ष साजिद शेख,तरुण भारत चे प्रसाद ठाकूर यांच्या हस्ते पूजा करत मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
कॅटोंमेंट बोर्डाच्या वतीनं या महा नाट्यास सहकार्य करण्यात येईल असं आश्वासन साजिद शेख यांनी तर पालिकेच्या वतीनं महापौर उपमहापौरांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी नितीन कपिलेश्वरकर अनिल चौधरी,किरण गावडे, आदी उपस्थित होते