मराठीसाठी लढलेल्या सीमा सत्याग्रहींचा त्याग डोळ्या समोर ठेऊन चौथ्या पिढीने लढा हातात घ्यावा असे आवाहन तालुका समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांनी केले आहे.बेळगाव तालुक्यातील किणये भागातील सीमा सत्याग्रहींच्या सत्कार कार्यक्रमात सहभागी झाल्यावर ते बोलत होते.
किणये विभाग तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती किणये ग्रामस्थांच्या वतीने सीमा चळवळीतील आंदोलकांचा सत्कार करण्यात आला. मराठी युवकांनी सीमा सत्याग्रहींची माहिती घ्यावी त्यातून प्रेरणा घेऊन मराठीसाठी कार्य करावे अस देखील आवाहन पावशे यांनी केल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश डुकरे होते तर यावेळी तालुका समितीचे वाय बी चौगुले पुंडलिक पावशे,संजय पाटील,दत्तात्रय शिंदे नामदेव साम्बरेकर,तानाजी डुकरे तसेच किणये सहकारी पथसंस्थेचे सदस्य उपस्थित होते.
किणये प्रमाणे बेळगुंदी सांबरा कंग्राळी उचगाव येथील सीमा सत्याग्रहींचा देखील सत्कार करण्यात येणार आहे.किणये येथे सत्कार झालेल्या सीमा सत्याग्रहींची नाव खालील प्रमाणे आहेत .
किणये-पुनाप्पा तातोबा दळवी ,कल्लापा ईश्वर गुरव,
कर्ले-लक्ष्मण भैरू किनयेकर,विठ्ठल भैरू किनयेकर,बापू दादा कुंदप,
बहाद्दरवाडी-नारायण धोंडीबा पाटील,बाळू निन्गाप्पा पाटील
रणकुंडये-विठ्ठल नागनगौडा पाटील
नावगे- तुकाराम चिगरे , बाळगमटटी -शटटू हिरामणी कदम ,खादरवाडी – आर आर पाटील