शिमोगा येथील एका दैनिकाने संत नामदेव महाराजांच्या वर आक्षेपार्ह लेख प्रकाशित केल्याच्या निषेधार्थ नामदेव देवकी समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करण्यात आली.
शिमोगा येथील दैनिक नाविक याने संत शिरोमणी नागदेव महाराजांच्या बद्दल लेखात आक्षेप आक्षेपार्ह लिखाण करून समस्त वारकरी संप्रदायाची बदनामी करण्यात आली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला . सदर वृत्त पत्राने हा लेख मागे घ्यावा तसेच समस्त नांदेव देवकी समाज वारकरी समाजाची माफी मागावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शेकडो वारकरी ,नामदेव देवकी समाज बांधव, शिंपी समाज बांधव बेळगाव शहापूर आदी उपस्थित होते.
Trending Now