राज्य सरकारने मंजूर केलेल्या 10 लाखा पैकी 8 लाख रुपये खर्चून केलेल्या चंदीगडच्या धर्तीवर बेळगावचा विकास व्हावा असं अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या नगरसेवकांना वाटतंय मंगळवारी पालिकेच्या सभागतुहात नगरसेवकांसाठी अभ्यास दौऱ्यावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत अनेक नगरसेवकांनी अभ्यास दौऱ्या बद्दल आपापली अनुभव मते मांडली विशेषतः चंदीगड येथील सेव्हेज ट्रीटमेन्ट प्लान्ट(stp project),कचरा निर्मूलन ,स्वच्छता कामकाज च्या धरतीवरच बेळगावचा विकास व्हावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते दीपक जमखंडी यांनी केली.
चंदीगड पालिकेतील अधिकारी आणि सर्व नगरसेवक समनव्ययाने काम करत असतात स्वच्छतेबद्दल जनजागृती मोहीम हाती घेतात केंद्र सरकार कडून मिळालेला निधीचा वेळेत विनियोग केला जातो मात्र बेळगावात परिस्थिती वेगळी आहे इथले अधिकारी नगरसेवकांना सहकार्यच करत नाहीत त्यामुळे बेळगावच्या विकासात समनव्ययाचा अभाव आहे त्यामुळेच बेळगाव विकासात मागे आहे असा आरोप अभ्यास दौऱ्यात सामील झालेल्या नगरसेवकांनी केला आहे.
एकीकडे अभ्यास दौऱ्याच बहुतांश नगरसेवकानी समर्थन केले असताना विरोधी गटातील नगरसेविका सरला हेरेकर यांनी मात्र दौऱ्या बद्दल आक्षेप व्यक्त केला आहे.नगरसेवकांनी अभ्यास दौऱ्यावर जाणे चुकीचं आहे त्यांनी सहल करून पालिकेच्या तिजोरी निकामी केली आहे नगरसेवकां ऐवजी अधिकाऱ्यांनी अभ्यास दौरा करायला हवा होता असा टोला देखील त्यांनी लगावलाय.शहराचा विकास खुंटला असून अनेक रस्ते करायचे आहेत याला अधिकारी जबाबदार आहेत असेही त्या म्हणाल्या. महापौर उपमहापौरांनी विषय धरून बोला असा सल्ला दिल्यावर त्यांचा तिळपापड झाला होता.
तुमच्या सारखे मी महापौरांना चप्पल दाखवणारी नसून अधिकाऱ्याना अभ्यास दौऱ्याची गरज आहे म्हणून माझा हक्क मांडत असल्याच म्हणाल्या.
नगरसेवक अनंत देशपांडे यांनी चंदीगड दौऱ्यावर काहीही न बोलता बहिष्कार टाकला होता सरला हेरेकर देखील या दौऱ्यात सामील झाल्या नव्हत्या देशपांडे यांच्या सारखे मौन पाळत विरोध करण सोडून आपणास हा दौरा मूकल्यानेच फ्रष्टरेशन मुळे त्या बोलल्या असतील अशी कुजबुज नगरसेवकात ऐकायला येत होती.