इंजिनियरिंग कॉलेजच्या एका प्रोफेसरने गळफास लावून आत्महत्त्या करून घेतल्याची घटना मंगळवारी सकाळी सदाशिवनगर येथे घडली आहे.आर व्ही गदग वय 51 अस मयत प्रोफेसरच नाव असुन ते सदाशिवनगर येथे घरात राहत होते.
या प्रकरणी समजलेल्या अधिक माहितीनुसार गदग हे सदाशिवनगर येथे पत्नी दोन मुला सह रहात होते अनगोळ येथील शेषगिरी के एल ई इंजिनियरिंग कॉलेज मध्ये सिव्हिल इंजिनियरिंगचे पर्यावरण विभागात कार्यरत होते. गेल्या काही दिवसा पासून ते गुडघ्याच्या आजाराने त्रस्त होते यात त्यांना खूप वेदना होत होत्या याला कंटाळून आत्महत्त्या केली असावी अशी शक्यता आहे.
ए पी एम सी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.