बेळगावच्या इतिहासात सर्वाधिक लोकप्रिय एस पी म्हणून गणले गेलेले आणि सध्या राज्य गुप्तचर विभागाचे डी आय जी असलेले संदीप पाटील यांची बेळगाव पोलीस आयुक्त पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. ३० नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट सेवा निवृत्त होणार असून त्यांच्या जागी संदीप पाटील यांना नेमण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
पाटील यांनी आपल्या बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून चार वर्षातील कार्यकाळात सर्वच क्षेत्रात आघाडी मिळवत कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात यश मिळवलं होतं,दर आठवड्याला जनता दरबार भरवून पोलीस आणि जनतेतील दरी खूप कमी केली होती. पाटील यांच्या बदली नंतर बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालय सुरु झाले त्यानंतर म्हणावा तेवढा लोकप्रिय अधिकारी बेळगावला लाभला नव्हता सध्य स्थितीत बेळगाव शहरातील जातीय तणाव वारंवार होणारे दगफेकीच्या घटना कायदा आणि सुव्यवस्थे वर नियंत्रण ठेवण्यात संदीप पाटील यांच्या सारख्याच अधिकाऱ्याची गरज आहे त्यामुळे नुकताच डी आय जी पदी प्रमोशन मिळालेले पाटलांना बेळगाव पोलीस आयुक्त पदी आणण्या साठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
३० नोव्हेंबर नंतर एक महिना आय जी पी कडे प्रभार द्यायचा आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संदीप पाटील यांना बेळगाव पोलीस आयुक्त पदी नेमावे असं देखील बोललं जात आहे . पुढील वर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर संदीप पाटील यांच्या सारख्या कार्यक्षम कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बेळगावात गरज आहे त्यामुळे पुढचे बेळगाव पोलीस आयुक्त कोण याबद्दल देखील कमालीची उत्सुकता लागली आहे.