Sunday, January 5, 2025

/

खोकला (कफ)- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

लहान मुलांना जेरीस आणणारा पुरातन शत्रू म्हणजे खोकला, अर्थात सानथोर सर्वांना सारखंच दमवतो. खोकला हे अनेक आजारांचे लक्षण आहे. खोकल्याचे प्रकारही अनेक असतात. शरीरात तयार झालेला जास्तीचा कफ बाहेर टाकण्यासाठी आपल्याला खोकला येतो. श्वसनमार्गाच्या आतील बाजूस अंतरत्वचेचे नाजूक आवरण असते. श्वसनातील हवेबरोबर सूक्ष्मजंतू किंवा धुजिलकरण जर आत आले तर या अंतस्त्वचेचा ओलसर केसाळ भाग त्यांना अडकवून ठेवतो. तसेच अंतस्त्वचेत निर्माण होणार्‍या चिकट पदार्थामुळे जंतुंची वाढ कमी होते व विषारी गुणही कमी होतात. परंतु तरीही ज्यावेळी या आवरणाला जंतूंचा जबर संसर्ग होतो व सूज येते तेव्हा श्लेष्मा किंवा हा चिकट पदार्थ जास्त प्रमाणात तयार घेऊन अंतस्त्वचेच्या आवरणाची आग होऊ लागते ते हुळहुळे बनते.
कारणे : 1) जीवाणू व विषाणू संसर्गामुळे थंडी, सर्दी व खोकला होऊ शकतो.
2) धूळ, धूर यांच्या अ‍ॅलर्जी (अपसर्ग) यामुळे खोक येते.
3) बालदमा हे ही खोकल्याचे एक मोठे कारण आहे.
4) डांग्याखोकला (अर्थातच एका सूक्ष्मजीवामुळे) अलीकडे लसीकरणामुळे जास्त आढळत नाही.
5) श्वसनमार्गदाहामुळे ठसका येतो.
6) जंत झाले असले तरी संसर्गामुळे खोकला येतो.Dr sonali sarnobat
खोकला येताना आपल्या श्वसन मार्गातील अवयवांच्या शिस्तबद्ध हालचाली होतात. खोकला येण्यापूर्वी खोल श्वास घेतला जातो. त्यामुळे कंठद्वार बंद होते आणि तेथील स्नायू आकुंचन पावतात परिणामी परिणामी छातीवर दाब तयार होतो. तेवढ्यात कंठद्वार उघडते आणि श्वसन मार्गातून वेगाने हवा बाहेर फेकली जाते. या हवेबरोबर घशातून जास्तीचा चिकट पदार्थ किंवा कफ बाहेर पडतो. काहीवेळा स्वरयंत्रामधून किंवा श्वासनलिकेतून धुलीकरणासारखे पदार्थही बाहेर पडतात. आणि खोकला येतो.
लक्षणे : खोकला हा सुका (कोरडा) किंवा कफयुक्त असू शकतो. कफ कोरडा होऊन घट्ट झाल्यावर सुका खोकला येतो व श्वसनमार्गात जास्त श्लेष्मा सुटल्यास कफयुक्त किंवा घरघर आवाज करणारा खोकला येतो. सर्वच प्रकारचे खोकले लहान मुलांना त्रासदायक ठरतात. थंडीच्या दिवसात किंवा हवामानात बदल होताना खोकल्याची साथ बळावते. अ‍ॅलर्जीचा कफ हा चिकट पांढरा असतो. संसर्ग झाला असल्यास पिवळट, हिरवा कफ येतो. कफ कधी एकदम घट्ट तर कधी पातळ असतो. कधी सहज खोल्यानेसुद्धा कफ बाहेर पडतो तर कधी खूप खोकूनही कफ बाहेर येत नाही. अति खोकल्यामुळे डोळे लाल होतात. चेहरा आरक्त होतो. कान गचच होतात. खोकल्याची उबळ आल्यावर थोडी थोडी लघवीसुद्धा होते. कायमचा खोला, दमा असल्यास पोटावर पडणार्‍या दाबामुळे हर्नियासुद्धा होऊ शकतो.
उपचार : खोकला येत असताना तेलकट, चिकट पदार्थ खाऊ नयेत. थंड पदार्थ (उदा. आईस्क्रिम, कोल्ड्रिंक्स) घेऊ नयेत. पाणी कोमट करुन प्यावे. गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. गरम पाण्यात हळद किंवा मीठ घालावे.
निसर्गोपच्चार : कांदा किसून रस काढावा, एक चमचा रस व एक चमचा मध अशा प्रमाणात मिसळून ठेवावे. दिवसातून एक एक चमचा तीन चार वेळा घ्यावे. तसेच बेहड्याच्या फळाचा दोन ग्रॅम गर, पाव चमचा मीठ, अर्धा चमचा मिरी आणि दोन चमचे मध एकत्र करुन दिवसातून दोनदा खावे. बेहड्याचे वाळलेले फळ गव्हाच्या पिठात घोळवावे आणि भाजून खावे.
होमिओपॅथी : कोणत्याही प्रकारचा खोकला, कोणत्याही वयातला खोकला, होमिओपॅथीने बरा होतो. खोकल्याची कारणे, लक्षणे, वय इ. माहितीप्रमाणे होमिओपॅथीक औषधे दिली जातात व अपेक्षित गुण हा येतोच. फक्त तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्यावी लागतात. हे उपचार घेताना ठराविक वेळेत शक्यतो रिकाम्या पोटावर औषधं घ्यावी लागतात. होमिओपॅथीक तज्ञांनी सांगितलेल्या डोसमध्ये व अमुक तेवढ्या काळासाठी उपचार घेतल्याने उत्तम गुण येतोच.

डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 9916106896
सरनोबत क्लिनिक 9964946918

 belgaum

3 COMMENTS

  1. मँडम आपल्या टिप्स आम्हास खुपच उपयोगी पडतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.