बेळगावातील अधिवेशनाचे सूप अखेर वाजले शुक्रवारी दुपारच्या सत्रातच अधिवेशन संपवण्यात आले .तेरा तारखेपासून सुरु झालेल्या अधिवेशनात महत्वाचे असे जनतेच्या भल्याचे काही निर्णय झाले नाहीत .वैद्यकीय कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले . बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्याचा इरादा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केल्यामुळे नवा जिल्हा चिकोडी की गोकाक याविषयी चर्चा सुरु झाली आहे . उत्तर कर्नाटकाचा विकास आणि हैदराबाद कर्नाटक भागाचा विकास करण्यास निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.आपल्या वास्तव्यात मुख्यमंत्र्यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवून विकासकामांचा शुभारंभ केला.
वैद्यकीय कायदा दुरुस्ती विधेयक रद्द करण्यासाठी खासगी डॉक्टरांनी सेवा बंद आंदोलन छेडले होते . आरोग्यमंत्री रमेशकुमार आणि डॉक्टर आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्यामुळे उपचारा अभावी राज्यात काही रुग्णाचा मृत्यू झाला . अखेर चर्चा होऊन विधेयक मंजूर करण्यात आले . धनगर समाजाने तर बकऱ्यांचा मोर्चा सुवर्णसौधवर आणून पोलिसांची भंबेरी उडवून दिली होती . बकरी हाकण्याचे आणि आंदोलकांना आवरायचे अशी दुहेरी भूमिका पोलिसांना पार पाडावी लागली . विविध संघटनांची आंदोलने हाताळताना पोलिसांना नाकेनऊ आले.याशिवाय अंधश्रद्धा विधेयक देखील याच अधिवेशनात मंजूर करण्यात आले .
माजी गृहमंत्री के जे जॉर्ज यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी कामकाज बंद केले होते पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात मिळून ७२ तर बुधवारी केवळ ३९ असे कमी आमदारांनी सभागृहात सहभाग दर्शवला होता त्यामुळे कमी आमदार सहभागी झालेल अधिवेशन म्हणून गणल जाईल .