बेळगावचा १६ वर्षीय स्केटिंगपटू अभिषेक नवले याच्या नावावर अनेक विक्रम आणि पदके आहेत. आता त्यात आणखी दोन गिनीज जागतिक विक्रमांची भर पडली आहे.
इनलाईन स्केट प्रकारात त्याने हे विक्रम केले आहेत. केएलई चे लिंगराज कॉलेज येथील स्केटिंग रिंक तसेच खानापूर रोड येथील फायर ब्रिगेड येथे त्याने हा विक्रम केला आहे.
अवघ्या १३.०२ सेकंदात १०० मीटर इनलाईन स्केट आणि १२.९९ सेकंदात १०० मीटर रोड स्केट असा त्याचा विक्रम आहे.