शिव सृष्टीचं रखडलेला काम कोणत्या ना कोणत्या कारणाने लांबणीवर पडत असतानाच फाऊंटन मेंटेनन्सला अडीच महिन्यांचा अवधी लागणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आगामी 15 दिवसात हे मेंटेनन्स च्या कामाची सुरुवात होणार आहे.बुधवारी दुपारी नगरसेवक विनायक गुंजटकर आणि आमदारांचे सहकारी जॉन्सन यांनी ठेकेदार अभियंते निखील पिंगळे शिव सृष्टीची पहाणी केली.
प्रिन्स कम्पनीला दिलेलं टेंडर रद्द करून सदर कम्पनीला ब्लॅक लिस्टेड करण्यात आले आहे पुणे येथील पिंगळे ऑडिओ इकॉस्टिक लिमिटेड या कम्पनीला चे संचालक निखिल पिगळे यांना नवीन काँट्रॅक्ट देण्यात आले आहे.
शिव सृष्टी साठी नवीन 32 लाखांचा टेंडर काढण्यात आला असून त्यानुसार एक्यूपमेंट रूम दुरुस्ती करण्यात येणार आहे. या एक्यूपमेंट रूम मध्ये पाणी साचत असल्याने 30 लाखांची मशिनरी पाण्यात जाण्याची शक्यता असल्याने हे काम हाती घेण्यात आले आहे.